भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील शेतकऱ्याची शेतात बांधलेली अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली.
या बाबत माहिती अशी की , गोजोरे येथील शेतकरी शिवशंकर बाबुराव पाटील यांच्या सुनसगाव रस्त्यावरील शेतात बांधलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी दि २० एप्रिल च्या रात्री अंधाराचा फायदा घेत चोरुन नेली बैलजोडी ची किंमत अंदाजे ८० हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.आता दोन महिन्यांपूर्वी सुनसगाव येथील शेतकऱ्याची श्री मनुदेवी मंदीराच्या जवळ बांधलेली बैलजोडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली होती.या चोरट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.