हेमकांत गायकवाड
चोपडा -राज्यव्यापी शंखनांद आंदोलनाच्या भाजपाच्या फतव्यानुसार चोपड़ा तालुका भारतीय जनता पक्षाचा वतीने शिवाजी महाराज चौकातील मारोती मंदिरात शंखनाद आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाच्याआदेश्याने राज्यव्यापी शंखनांद आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात करण्यात आले .ठाकरे सरकार ने मागील पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करून ठेवले आहेत आता सर्व व्यवहार सुरळीत केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत मंदिरावर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्याची उपासमार होत आहे त्यांना राज्य सरकारने कोणतीही अर्थिक मदत देत नाही आणि मंदिरे देखिल उघडली जात नाही देश्यातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरू आहे म्हणूनच देव धर्मा वर सातत्याने अन्याय करणाऱ्या देवतांना बंदिस्त करून लाखो गरिबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकार ला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे राज्यव्यापी शंखनांद आंदोलन छेडण्यात आले .
या वेळी पंकज पाटील तालुकाध्यक्ष राकेश पाटील भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पाटील संचालक रवि भाऊ मराठे मा.शहरध्यक्ष प्रकाश पाटील युवा मोर्चा अध्यक्ष विजय बाविस्कर बुथ प्रमुख शेखर ठाकरे परेश धनगर भरत दादा मितावली धर्मदास पाटील कैलास पाटील योगेश महाजन राकेश भाऊ हिरालाल भाऊ पवन दादा आदी उपस्थित होते .