चोपडा- धानोऱ्यातील एटीएम मशीन चोरांनी पळवले… तीन वेळा चोरीचा प्रयत्न फसला होता.

हेमकांत गायकवाड

चोपडा,धानोरा ता .: तालुक्यातील धानोरा येथील जळगाव रस्त्या लगत असलेल्या ग्रा.प. शॉपींग सेंटरमधील इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीनच थेट आज मध्यं रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दरम्यान या घटनेने मोठी खळबळ धानोरा सह परिसरात माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की धानोरा गावाबाहेरील जळगाव रत्यांवरील ग्रा.प. मालकीच्या शॉपींग सेंटरमध्ये इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीन अनेक वर्षांपासून या ठिकाणी बसविण्यात आले आहे, दरम्यान काल रात्री दोन ते तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन तोड फोड करण्याचा आतेनात प्रयत्न केला परंतू त्यातही असफल झाल्याने थेट (ट्रक ) मालवाहतूक गाडीत मशीनच उचलून घेवून गेले. या पुर्वी तीनदा हे मशीन फोडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र काल रात्री हे मशीन चोरट्यांनी चोरून एका बारा चाकी ट्रक क्र. एमएच 28: 8559 माल वाहतूक (ट्रक) गाडीवर

ठेवत असल्याचे येथील सदगुरु ऑईस्क्रीम दुकानाबाहेर लावलेल्या सीसी टिव्ही फुटेजमध्ये दिसुन आले आहे. धानोरा विदयालयाबाहेरील लावलेल्या सीसी टिव्ही कॅमेरामध्ये रेकॉडींग रिचार्ज नसल्याने मुळे होत नाही, अशी माहीती यावेळी मिळाली.

‘दरम्यान दोन वर्षापुर्वी देखील धानोर यात चार अज्ञात चोरट्यानी सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून तीन लाख च्या वरती रक्कम लुटून नेली होती , त्या घटनेचा अध्यापही थांगपत्ता नाही. घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे स. पो.नि. किरण दांडगे, उपनिरिक्षक पाटील, बीट हवालदार सुनिल तायडे, कादीर शेख आदींनी भेट देऊन.

‘दरम्यान दोन वर्षापुर्वी देखील धानोर यात चार अज्ञात चोरट्यानी सेंट्रल बँकेचे एटीएम फोडून तीन लाख च्या वरती रक्कम लुटून नेली होती , त्या घटनेचा अध्यापही थांगपत्ता नाही. घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे स. पो.नि. किरण दांडगे, उपनिरिक्षक पाटील, बीट हवालदार सुनिल तायडे, कादीर शेख आदींनी भेट देऊन पाहणी केली. घटनेच्या दुष्टीने तपास सुरू केल्याची माहिती सपोनि किरण दांडगे यांनी सांगितले दिली. .