मुलांना रागवू नका, चित्रकलेतही करीअर एलेमेंटरी परीक्षेच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रा.संजय नेवे यांचे प्रतीपादन

जळगाव – मुले सकारात्मक पध्दतीने घडत असतात त्यांच्या आवडीनुसार काम करू द्या, अनेकवेळा मुलांच्या कला दाबल्या जातात पालक त्यांना हे करू नको, ते करू नको, अभ्यास कर अहो चित्रकला हा पण अभ्यासाचा भाग आहे.मुलांना रागवू नका चित्रकलेतही आता करिअर असल्याचे चोपडा येथील ललित कलाकेंद्रचे प्राध्यापक संजय नेवे यांनी गुणगौरव सोहळा प्रसंगी प्रतिपादन केले.

येथिल पिंप्राळा परीसरातील कलादर्शन ड्राॅईंग क्लासेस तर्फे एलेमेंटरी/ईंटरमिजिएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळा दि.३१ मार्च रोजी पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवी च्या प्रतीमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर एलेमेंटरी / ईंटरमिजीएट परिक्षेचा वार्षिक गुणगौरव सोहळ्यात विद्यार्थाना स्मृतिचीन्ह (ट्राॅफी)देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास ललित कला केंद्र चोपडा येथील प्राध्यापक संजय नेवे, महात्मा गांधी विद्यालय धरणगावचे ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र पाटील क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्थाचे उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे तसेच नृत्यकला दिग्दर्शक नरेश बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते. मुलांना कलेची आवड असेल तर पालकांनी त्यांच्या कलेस प्रोत्साहन दिले पाहिजे.व कला क्षेत्रातील उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधी यावर संजय नेवे यांनी पालकांना मार्गदर्शन केले.

तर राजेंद्र पाटील सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, मुलांना मुक्तपणे चित्र रेखाटु द्या. यामुळे त्यांचा बौध्दीक विकास तर होईलच त्यासोबत त्यांच्या कलेला चालना व प्रोत्साहन मिळेल. क्लासचे संचालक विजय चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन जान्हवी जोशी व राजेश्वरी साळवी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सार्थक जैन, दक्ष पाटील,अभिराज चव्हाण यांनी परिश्रम घेतले.