कारऐवजी चक्क जेसीबीतून घरी गेले नवरदेव नवरी!

लग्न म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉईंट. प्रत्येकाची लग्नासाठी काही स्वप्ने असतात. काहींना प्रीवेडिंग शूटचा क्रेज असतो. कुणाला थीम वेडिंग करायचं असतं, तर कुणाला डेस्टिनेशन वेडिंग. एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी काहिंना लग्नानंतर फिरायला जायचं असतं. तर, काहींना आपलं लग्न आठवणीत राहावं, यासाठी काहीतरी हटके करायचं असतं. असाच एका हटके लग्नातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इथं नवरदेव-नवरीने लग्न झाल्यानंतर कारनं येण्याऐवजी चक्क जेसीबीला पसंती दिल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हा व्हिडीओ पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर शेअर केलाय. आणि तो पाकिस्तानातील हुंझा खोऱ्यातील असल्याचं म्हटलं जातंय. व्हिडीओत खोदकामासाठी वापरल्या जाणाऱ्या जेसीबीला छानपैकी फुलांनी सजवण्यात आलंय. पुढे नवीन लग्न झालेले जोडपे उभे असलेले दिसत आहे. जेसीबीच्या पुढच्या बकेटमध्ये छानशा दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. तर, या जेसीबीच्या सोबतच लग्नातील इतर पाहुणे चालत येताना दिसताहेत. काहीजण व्हिडीओ काढत आहेत, तर काही जण टाळ्या वाजवून या जोडप्याचं स्वागत करत आहेत. पुढे गेल्यानंतर दोघांच्या स्वागतासाठी फटाके फोडले जात आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंत नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही म्हणताहेत की खरंच या नवविवाहीत जोडप्याचं कौतुक करायला पाहिजे. तर, एक ट्रोलर म्हणतोय, हा जेसीबी त्याला लग्नात भेट म्हणून मिळालाय, वाटतं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh