जळगाव -: मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांचे मार्फत जिल्ह्यात फरार आरोपीतांची शोध मोहिम राबविण्यात आली आहे. त्यावरून मा. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे पथकातील पोह जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोना नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, राजेंद्र पवार सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की आरोपी गोकुळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी, रा. भोलाणे ता.जि.जळगाव हा गुन्हा केल्या पासून २ वर्षापासून फरार होता.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील वरील पथक हे फरार आरोपीबाबत माहिती घेत असतांना मां. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, यावल पो.स्टे. येथे दाखल असलेल्या गु र नं ६/२०२० भादवि कलम ३५३,३७९,३३२,३४ या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गोकुळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी, रा. भोलाणे ता.जि.जळगाव हा गुन्हा केल्या पासून सतत 2 वर्ष फरार असून तो सध्या जळगाव तालुक्यातील भोलाणे गावात, बांभोरी गावात, जैनाबाद भागात असे वेगवेगळया ठिकाणी घर बदलवुन राहत असल्याची माहिती मिळाली.त्यावरुन वरील पथक हे भोलाणे ता. जि. जळगाव येथे जावून शोध घेतला असता तेथून गोपनीय माहिती मिळाली की, तो जळगाव येथील जैनाबाद येथे नातेवाईकांकडे असल्याचे समजल्याने वरील पथक हे जैनाबाद येथे जावून शोध घेतला असता आरोपी गोकुळ उर्फ डॉन रघुनाथ कोळी, रा.भोलाणे ता.जि.जळगाव यास जैनाबाद येथे मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून वैद्यकिय तपासणी करून त्यास यावल पो.स्टे. चे ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले आहे,