जळगाव – चाळीसगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माजी माजी नगरसेवकावर अज्ञात पाच हल्लेखोरांनी गोळीबार करून जखमी केल्याची खळबळजनक घटना बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान ही घटना घडल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील माजी नगरसेवक बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळजनक उडाली आहे. ही घटना देवरे हॉस्पिटल समोर आज(बुधवारी) ७ फेब्रुवारी दुपारच्या सुमारास घडला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या व्हिडीओमध्ये एका कारमधून पाच जण उतरताना दिसत आहेत. त्यांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याचे दिसत आहे. एका पाठोपाठ एक असे पाच जण हातात बंदुका घेवून आले आणि त्यांनी गोळीबार केला. या गोळीबारमध्ये माजी नगरसवेक बाळू मोरे थोडक्यात बचावले आहेत. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेची गंभीर दखल घेत चाळीसगाव पोलीसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. अशातच या घटनेमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.