भुसावळ – गेल्या तीन चार दिवसांपासून सलग सुरू असलेल्या चक्रिवादळ व गारपीट मुळे भुसावळ तालुक्यातील अनेक गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे एवढेच नाही तर शेतीशिवारातील पिकं आडवी पडली आहेत फळांच्या बागा आडव्या झाल्या आहेत त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत आपल्याला नुकसान भरपाई मिळावी ही आशा शेतकऱ्यांना आहे . नुकतीच आहे. संजय सावकारे यांनी तालुक्यातील सुनसगाव , बेलव्हाळ येथे शेती शिवारात जाऊन पिकांची पाहणी केली . यावेळी महसूल विभाग व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांना नुकसान ग्रस्त भागाचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , बेलव्हाळ चे रमेश सोनवणे , दत्तात्रय पेठकर , रविंद्र नामदेव पाटील , अविनाश जंगले , प्रविण भंगाळे , विकास भंगाळे , चेअरमन सुदाम भोळे , भास्कर पाटील ,चेतन पाटील व शेतकरी उपस्थित होते.