भादली येथे झालेल्या खुनाचा उलगडा करून आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

जळगाव -दिनांक ०३/१०/२०२२ रोजी जळगाव येथील तरुणाची हत्या करून भादली येथील पाटावर मयताची प्रेत मिळून आल्याने सदर ठिकाणी मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव सदर गुन्ह्या उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. त्यावरुन मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील स पो नि जालींदर पळे, पो उप निरी अमोल देवढे, सफौ रवि नरवाडे, पोह संजय हिवरकर, राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पोना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांचे पथक नेमण्यात आले होते.

मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मयत सौरभ यशवंत चौधरी व त्याचा साथीदार ईश्वर नथ्थु सपकाळे हे नेहमी सोबत राहत असून साधारण ४ ते ५ दिवासापुर्वी या दोघांचा वाद झाला होता. अशी बातमी मिळाल्याने मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी पथका सह ईश्वर नथ्थू सपकाळे याचा शोध घेतला असता तो दिनांक ०३/१०/२०२२ रोजी सकाळ पासून घरी नव्हता. त्यावेळी त्याचे घरच्यांना त्याबाबत विचारपुस केली असता तो कुठे गेला याबाबत सांगता येणार नाही असे सांगीतले.

ईश्वर नथ्थु सपकाळे हा मुळचा कानळदा ता. जि. जळगाव येथील राहणार असल्याने त्याचा सदर भागात शोध घेतला असता तो आज रोजी दिनांक ०६/१०/२०२२ रोजी कानळदा शिवारात मिळून आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास मा. पोलीस निरीक्षक श्री किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी विचारपुस केली असता ईश्वर सपकाळे याने सांगितले की, मयत सौरभ यशवंत चौधरी, रा. दशरथ नगर जळगाव याने माझे कडून हात उसनवार पैसे घेतले होते. दिनांक ०२/१०/२०२२ रोजी ०९.३० वा. चे सुमारास मोटार सायकल मी व मयत सौरभ चौधरी असे श्रीराम चौक जैनाबाद येथून निघुन भादली येथील पाटचारी वर बसून गप्पा मारत असतांना मी मयत सौरभ चौधरी यास हातउसनवारीचे पैसे मागण्यास गेलो असता आमच्या दोघात वाद होवून भादली ता. जि. जळगाव येथील पाटचारी जवळ धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने त्यास मारून जिवेठार केले असे सांगत गुन्ह्यांची कबुली दिली आहे.