तळेगाव येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : जयसिंग वाघ

तळेगाव  – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक इमारत व स्वतःचे निवासस्थान बांधण्या करीता तळेगाव दाभाडे येथे १९४७ मध्ये २३ एकर जमीन खरेदी केलेली आहे, या ठिकाणी स्वतःचे निवासस्थान बांधले या निवासस्थानि बाबासाहेब काही दिवस विश्रांति करीता येत असत मात्र पुढं काही करणांनि ही जमीन व निवासस्थान काळाच्या पडद्याआड गेले, बहुतांश जमिनीवर इतरांची घरे बांधली गेली पण प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते, साहित्तीक किसन थुल, एडव्होकेट रंजना भोसले व जनतेने बाबासाहेबांचे निवासस्थान शोधून काढून, ताब्यात घेवून मोठे ऐतिहासिक कार्य केले आता या निवासस्थानाचे लवकरच राष्ट्रीय स्मारक व्हावे असे विचार प्रसिध्द साहित्तीक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.

जयसिंग वाघ यांनी ४ मार्च रोजी या निवासस्थानास भेट देवून बाबासाहेबांच्या निवासस्थाना करीता लढ़ा उभारणारे किसन थुल यांची भेट घेवून चर्चा केली. या प्रसंगी केलेल्या मनोगतात वाघ यांनी सांगितले की बाबासाहेबांनि पुणे जिल्ह्यात जवळ जवळ चार ठिकाणी१०० एकर जमीन विद्यालय, महाविद्यालय, बौद्ध स्तूप बांधण्या करीता स्वतः खरेदी केली आहे मात्र त्यांचे हे कार्य पूर्ण होवू शकले नाही. ते काम किसन थुल सारखे माणसंच पूर्ण करु शकतील.

सुरवातीस पल्लवी थुल यांनी या संदर्भाचा लढ़ा, निवासस्थानाची ऐतिहासिकता, नव्याने केलेला विकास या विषयी सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी माधुरी थुल, विश्वजीत थुल, विलास गजभिये, एल. डी. कांबळे, सचिन वाघ, मयूर वाघ , तुकाराम मोरे, प्रा. विलास गरुड़, प्रा. सत्यजित मोरे, जीवन मोरे व इतर कार्यकर्ते हजर होते.