जळगाव – आज सकाळी उघडकीस आलेल्या सागर पाटील याच्या हत्येच्या गुन्ह्मातील २ संशयित आरोपीनाअमळनेर शहरात जाऊन अटक एमआयडीसी पोलीस ठाण्यात आज हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी आरिफ शहा अय्युब शहा ( रा. छोटा सालार नगर ) व जुबेर शेख भिका सिकलिगर ( रा. मासुमवाडी, कासमवाडी जवळ ) हे मयत सागर वासुदेव पाटील ( रा. कासमवाडी ) याचा खुन करुन फरार झाले होते.पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, , जळगाव, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, , सहा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, यांनी आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि किरणकुमार बकाले यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे या फरार आरोपी बाबत बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत आरोपी अमळनेर येथे त्यांचे नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी पोहेकॉ सुधाकर रामदास अंभोरे, सुनिल दामोदरे, अक्रम शेख , महेश
महाजन, पोना विजय पाटील, अविनाश देवरे, पोकों सचिन महाजन, पंकज शिंदे यांचे पथक तयार करुन त्यांना अमळनेर येथे खाजगी वाहनाने रवाना केले.
या पथकाने आरोपीचा अमळनेर शहरात शोध घेतला आरोपी आरिफ शहा व जुबेर सिकलिगर हे अमळनेर शहरात बुलढाणा अर्बन बँक जवळ एका झाडाखाली उभे दिसले पथकातील अंमलदार यांनी अवघ्या ८ तासात दोन्ही आरोपीना शिताफीने जेरबंद करून त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर केले
मयत सागर पाटील याचे विरुध्द ५ गुन्हे दाखल असुन त्यास एका गुन्हयांत शिक्षा झालेली होती तो उच्च न्यायालयाकडून अपील जामीनावर सुटलेला होता.