धुळे हादरलं! खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरलं अन् क्षणभरात गेला जीव, पहा VIDEO

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खेळताना दहा वर्षाच्या मुलाने विजेच्या खांबाला धरल्यानंतर दुर्दैवी घटना घडली.

विजेच्या खांबात विद्युत प्रवाह असल्याने त्याचा क्षणभरात मृत्यू झाला. या घटनेने शहर हादरलं आहे. तसेच या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण – धुळे शहरात एक दुर्दैवी घटना घडली.

दहा वर्षे मुलाचा विजेच्या खांबाला चिटकून मृत्यू झाला आहे. अर्शद अहमद अशपाक मोमीन असे मृत्यू झालेल्या या दहा वर्षाच्या मुलाचे नाव आहे. विजेच्या खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने अर्शदचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

स्थानिकांनी केला हा आरोप – दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी महावितरणवर रोष व्यक्त केला आहे. 10 वर्षाच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तक्रार करूनही समस्येचे निराकरण न केल्याने अर्शदाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोपही स्थानिकांनी केला आहे. दरम्यान, या घटनेने शहर हादरलं आहे.