जळगाव :- येथिल कांचन नगरातील जागृत गुरुदत्त मंदिराला प्रसिध्द भागवताचार्य कन्हैया महाराज सूर्यवंशी यांनी आज २७ रोजी भेट दिली. त्या वेळेस मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी व उमेश सोनवणे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहार देवून त्यांचा सत्कार केला. त्या प्रसंगी मंदिरात गुरुदत्ताची आरती कन्हैया महाराज यांच्या हस्ते झाली. त्या प्रसंगी महाराजांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, या मंदिराच्या भूमिपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंदिराच्या भुमिपूजन झालेल्या जागेत असंख्य अवदुंबराचे झाड अचानक उगवले म्हणजे अवदुंबर हे झाड गुरुदत्तांचे प्रतिक आहे. म्हणून हे जागृत मंदिर आहे.
https://youtube.com/shorts/Df0U2mFHGrY?feature=share
येथे जो भाविक नवस मानतो तो नवस गुरुदत्त पुर्ण करतात मंदिराच्या भावी वाटचाली त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी, नामदेव पाटील, मुकेश कोळी, दिलीप सपकाळे, एकनाथ शिंपी, भगवान नन्नवरे, सचिन हिवरकर, रवींद्र सोनवणे तेजस कोळी, भूपेंद्र शर्मा, राकेश शिंपी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.