शाहरुख खानला जिवंत जाळणार, जगतगुरू पमरहंस आचार्य यांची धमकी

पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीए. अयोध्य़ेतील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी या चित्रपटावरून शाहरुख खान याला जिवंत जाळण्याची धमकी दिली आहे.

”पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान केला आहे. जाणून बुजून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून पैसे कमवायचा यांनी धंदा केला. हा फिल्म जिहाद आहे. हे रणनीती आखून केले जाते. ज्या दिवशी मला शाहरुख खान भेटेल त्यावेळी त्याला मी जिवंत जाळेन व जाळण्याआधी त्याची चामडी सोलून काढेन. जर त्याला भगव्याची एवढी चीड आहे तर त्याला दाखवेन त्याच्या शरीरात वाहणारं रक्त देखील भगवंच आहे. भगव्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मी तर शोधतच आहे. माझे कार्यकर्ते मुंबईत त्याला शोधतच आहेत. पण जर माझ्या आधी कुणी त्याला शोधलं आणि जाळलं तर त्याचा खटला मी लढेन. त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करेन. कोणीही सनातनचा अपमान करेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, अशी धमकीच अयोध्येतील संत जगतगुरू परमहंस आचार्य यांनी दिली आहे.