जळगावचे बेजबाबदार आमदार आणि महापौर.

जळगाव-: जिल्हा न्यायालयासमोर आता पंधरा वर्षांनी रस्ता बनवणे चालू आहे.चालू म्हणजे ” चालू “काम आहे.थातूरमातूर.

हा रस्ता कोणा मक्तेदाराला दिला?किती निधी मधे दिला?काम किती दिवस चालेल?कामाचे स्वरूप कसे राहिल? सिमेंटचे डांबरचे? त्याची लांबी रूंदी खोली किती राहिल?असे टेक्निकल एक्झिबिशन बोर्ड लावलेले नाही.याची माहिती जळगाव चे आमदार सुरेश भोळे यांना सुद्धा नाही.महापौर जयश्री महाजन व आयुक्त विद्या गायकवाड यांना सुद्धा नाही.कारण या लोकांना या रस्त्याची गुणवत्ता विषयी काहीच घेणे देणे नाही.तर मग,ही मंडळी पदावर बसली का? असे बेफिकीर, बेजबाबदार लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जळगाव चे असल्याने रस्त्यांची वाईट अवस्था झाली आहे.

जर यांनाच माहिती नाही तर लोकांना कसे कळेल? अशी ही अंधेरी नगरी आती आंधळा राजा आहे.

आम्ही आमदार भोळे आणि महापौर यांना आवाहन करतो कि तुम्ही पदावर आहात तोपर्यंत तरी या रस्ता कामाची वर्क ऑर्डर दाखवा.वाचा.तुम्हाला तरी कळते का?यांनी अजूनही या कामाची वर्क ऑर्डर वाचलेली नाही.कारण यांना मिळालीच नाही.

या कामाची विशेष अशी वर्क ऑर्डर नाही.रस्त्याचा कुठेही उल्लेख नाही.मक्तेदाराला ३४ कोटी देऊन टाकले. जसे टोपलीत रेती माती देतो.आणि काम सांगितले ,तुला जे जमले ते बनव.फक्त आमचे कमिशन काढून दे.नंतर आमचे , आमच्या बायकोचे,नवऱ्याचे,मुलाचे,नातूचे सौजन्याने हा रस्ता बनवला,असे बोर्ड लावून दे.आम्ही उद्घाटनाला येऊ.

आमदार सुरेश भोळे यांना कोणताही कारकून, अभियंता प्रतिसाद देत नाहीत.माहिती तरी कशी देणार?अशी तक्रार दस्तुरखुद्द आमदार भोळेंनी केली होती.काय उपयोग आमदार होऊन? त्यापेक्षा आपली दुकानदारी बरी.कोणी डोके खायला तर येणार नाही.

आमदार भोळे आणि महापौर महाजन यांनी रस्ता गटार स्वच्छता कडे लक्ष न देता सर्वच निवडणूका लढण्याचा सपाटा लावला आहे.फक्त खडसेच नव्हे ,यांना ही सर्वच पदे स्वताच्या कुटुंबात पाहिजे.म्हणजे सर्वच वही,दही,मही आपल्याच घरात येईल.आमदार सुरेश भोळे,पत्नी सीमा भोळे महापौर होतेच.तरीही काहीच काम केले नाही.आताही महापौर जयश्री महाजन आणि त्यांचे पतीदेव सुनील महाजन विरोधी पक्ष नेता.तरीही ही वाईट अवस्था.यांचीच मुले,नातू ,जावई यांना महानगरपालिकेत कारकून, सिपाई, अभियंता पदावर ठेवले तरीही काम होणार नाही.कारण ही पदे सेवेसाठी नसून त्यांची उत्पन्नाची साधने आहेत.

एमआयडीसी मधे कारखाना टाकणे किंवा डी मार्ट चालू करण्यापेक्षा येथे राजकारणात चांगला नफा मिळतो.

माझी मागणी आहे कि, आमदार भोळे आणि महापौर महाजन यांनी कोणत्याही मंत्री कडे निधीसाठि साकडे घालण्याऐवजी स्वताच्या खाजगी मालमत्तेतून रस्ते बनवले पाहिजे.जे पैसे निवडणूकीत मतांसाठी वाटणार आहात,तेच पैसे रस्ते बनवण्यासाठी खर्च केले पाहिजे.रस्ते बनवणे तुमची जबाबदारी आहेच‌.कोणतेही निमीत्त ऐकून घेतले जाणार नाही.नाहीतर तुमच्याकडून मतांचे पैसे घेऊ तरीही तुम्हाला मत देणार नाहीत.असा निश्चय जळगाव शहरातील मतदारांनी केलेला आहे.

शिवराम पाटील ९२७०९६३१२२                          महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव