वराडसिम ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा केबल वायरची चोरी ?

सुनसगाव वार्ताहर

भुसावळ – येथून जवळच असलेल्या वराडसिम येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी लंपास केली असल्याने गावाचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची वेळ आली आहे.

या बाबत माहिती अशी की , वाघुर धरणाच्या लगत वराडसिम गावाला पाणीपुरवठा करणारी विहिर आहे या विहिरीच्या विजपंपा साठी ९० फूट तांब्याच्या तारा असलेली केबल वायर टाकण्यात आलेली होती मात्र अज्ञात चोरट्यांनी २० त २२ हजार रुपये किंमतीची केबल वायर चोरुन नेली आहे त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची वेळ आली आहे . या बाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे विनोद पचरवाल , संजय ढाके , चेतन खाचणे यांनी सांगितले आहे.