सुनसगाव ता भुसावळ वार्ताहर – भुसावळ तालुक्यातील पिंप्री सेकम शिवारातील गट क्रमांक ३१६ येथे अवैधपणे मुरुम उत्खनन करून डंपर मध्ये भरताना वरणगाव मंडळ अधिकारी व तलाठी पथकाने दि १७ आॅक्टोबर रोजी पोकलॅंड व डंपर अशी वाहने गौण खनिज वाहतूक करण्याचे उद्देशाने आढळून आले होते त्यामुळे तहसीलदार भुसावळ यांच्या आदेशाने भुसावळ तहसील आवारात लावण्यात आले होते मात्र दि ९ नोव्हेंबर च्या पहाटेच्या सुमारास ही वाहने गायब झाली आहेत.
वास्तविक पाहता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने ग्रामिण पातळीवर तलाठी व मंडळ अधिकारी जिवावर उदार होऊन अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्या व्यावसायिकांशी पंगा घेतात आणि आदेश देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारातून वाहने गायब होऊ लागली तर इतरांची काय कथा असा प्रकार भुसावळ तहसील कार्यालयात पाहण्यास मिळत असल्याने सुज्ञ नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.