हेमकांत गायकवाड
चोपडा : आ.भा.गुर्जर देवसेना दिल्ली . चे मा.श्री. भिमसिंग गुर्जर , (राष्ट्रीय कार्याध्यक्ष). हे जळगांव दौऱ्याला आले असता , जळगांव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. त्यांचे स्वागत आ.भा.गुर्जर देवसेना जळगांव, महाराष्ट्र. च्या संघटन टीम ने फुलपुष्प देऊन रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावरून जळगांव अजिंठा शासकीय विश्रामगृह निवस्थानी आगमना चा वेळी महाराष्ट्रची मुलूख मैदानी तोफ मा.श्री. गुलाबराव पाटील (जळगांव पालकमंत्री तथा जलसंपदा कॅबिनेटमंत्री). यांनी अ.भा.गुर्जर देवसेना दिल्ली चे मा.श्री. भिमसिंग गुर्जर , (राष्ट्रीय कार्याध्यक्ष). यांचे पुष्पगुच्छ नारळ व शाल देऊन सत्कार केला. व त्यानंतर आ.भा.गुर्जर देवसेना महाराष्ट्र कडून मा.श्री. गुलाबराव पाटील (जळगांव पालकमंत्री तथा जलसंपदा कॅबिनेटमंत्री).यांच्या मार्फत मा.श्री. उद्धव जी ठाकरे (मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन) याना निवेदन देण्यात आले की श्री भगवान देव नारायण बोर्ड गठन समिती मान्यता मिळावी राजस्थान सरकार कडुन साल 2009 मध्ये तसेच मध्ये प्रदेश सरकार कडून साल 2020, ला यांच्या मार्फ़त बोर्ड ला मान्यताप्राप्त झाली आहे. तसेच श्री भगवान देवनारायण बोर्ड गठन समिती बाबत मान्यता महाराष्ट्र सरकार कडून मिळावी असे निवेदन सादर करण्यात आले.. जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील समाजातील बहुसंख्य गुर्जर समाज तसेच मागासवर्गीय प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या आधुनिक शैक्षणिक क्षेत्रात मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने कडून मान्यता मिळावी अशा बाबतीत मा.श्री. गुलाबरावजीपाटील जळगांव यांना आ.भा.गुर्जर देवसेना महाराष्ट्र यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले. तसेच कार्यक्रमालाउपस्थित असलेले आ.भा.गुर्जर देवसेना महाराष्ट्र राज्यचे पदाधिकारी उपस्थितीत होते त्या
किरण गुर्जर , आ.भा.गुर्जर देवसेना (जळगांव जिल्हा युवा अध्यक्ष) महाराष्ट्र
आ.भा.गुर्जर देवसेना चे (राष्ट्रीय सचिव) मा.श्री.डॉ. गजाणन पाटील ,
महाराष्ट्र राज्य आ.भा.गुर्जर देवसेना चे (राज्य उपाध्यक्ष) मा.श्री. सुनिल चौधरी
राज्य प्रदेश युवा प्रमुख महासचिव मा. श्री.विवेकश्री गुर्जर .
महासचिव जळगाव जिल्हा युवा मा.श्री. प्रविण पाटील,
मयूर पाटील धरणगावं , उज्वल पाटील वर्डी, ह.भ.प.मा.श्री. राधेश्याम पाटील लोणी , कुलदीप पाटील , पुष्कर पाटील व महाराष्ट्रतिल सर्व पदाधिकारी यांनी अजिंठा विश्रामगृह जळगाव येथे मीटिंगमध्ये उपस्थिती लाभली . मान्यवरांच्य फुलगुच्छ नारळ व शाल देऊन स्वागत केले.आ.भा.गुर्जर देवसेना महाराष्ट्र राज्य चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.