ममुराबाद-: राज्य सरकारने दिवाळीनिमित्ताने रेशन दुकानातून रवा, साखर, हरभरा डाळ आणि पामतेल या चार वस्तूंचे किट ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमातून गरिबांना देण्याचा निर्णय घेतला, पण या उपक्रमात काहि तांत्रीक अडचणी मुळे आनंदाचा शिधा दिवाळी अगोदर मिळाला नाही. उशिरा का होईना शिधा मिळाला परंतु त्या किटमधील साहित्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठाच केला नाही. त्यामुळे ममुराबाद येथे साखर, शिवायच हा शिधा वाटप करावा लागत आहे. परिणामी शासनाच्या उद्देश्याला हरताळ फासला गेला. अनेक दारिद्र्य रेषेखालील व प्राधान्य कुटुंब कार्डधारकांच्या पदरात ‘आनंदचा शिधा’ अर्धवटच पडला.त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहावयास मिळाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ लताबाई अशोक तिवारी, शैलेश पाटील, आरती पाटील, विलास शिंदे, अमर पाटील, सचिन पाटील, यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना दिवाळी किटचे वाटप करण्यात आले.