भादली येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यु, घातपाताची शक्यता.

[10/8, 3:17 pm] Mahendra Sonawane: जळगाव-(प्रतिनिधी )नशिराबाद गावाजवळील कडगाव फाट्याजवळ भादली येथील तरूणाचा संशयास्पद मृतदेह आढळूल आल्याने आज सकाळी उघडकीला आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत असे की, संदेश लिलाधर आढाळे वय 22 रा. डोंगरकठोरा. ता. यावल , ह.मु. भादली ता.जि.जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.संदेश लिलाधर आढाळे हा आई वडीलांसह भादली येथे वास्तव्याला होता. जळगावात एका खासगी फायनान्सक कंपनीत कामाला होता. संदेशचे वडील खासगी वाहन चालक असून ते नाशिक येथे राहतात. दरम्यान, बुधवार 10 ऑगस्ट रोजी सकाळी संदेशचा मृतदेह नशिराबाद पोलीस हद्दीतील कडगाव रस्त्यावरील पाटचारीजवळील शेतात आढळून आला आहे. या घटेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, एएसआय अलियार खान, समाधान पाटील, किरण बाविस्कर, संजय जाधव, बाळू पाटील या पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून संदेश आढाळे याचा मृतदेह आल्याचे आढळून आले. त्याच्या पोटावर आणि डोक्यावर घाव आढळुन आले असल्याने त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात वडील लिलाधर राघो आढाळे, आई छाया आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या घटनेबाबत पोलीस चौकशी करत आहे.