जळगाव – : शहरात मोठया प्रमाणात होत असलेल्या घरफोडी व दुकान फोडण्याचे प्रमाणात वाढ झाल्याने मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तपासा बाबत आदेश दिले. त्यावरून मा. किरणकुमार बकाले, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी त्यांचे स्वतंत्र पथक तयार करुन त्यात पो ह जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, पोना नितीन बावीस्कर, प्रितम पाटील, विजय पाटील, अविनाश देवरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव अश्यांची पथक नेमण्यात आले होते.
स्थानिक गुन्हे शाखा जळगाव कडील वरील पथक हे जळगाव शहरात फिरून गुप्तबातमीदारा मार्फत माहिती काढत असतांना मा. पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातील फिर्यादी आनंद नागला यांचे मदनलाल पांडुरंग नागला नावाचे किराणा दुकानाचे शटर उचकावुन त्यातून 90000/- रु. रोख रक्कम चोरून नेली आहे. त्याबाबत जळगाव शहर पो.स्टे. भादवि कलम ३८०.४५७ प्रमाणे दिनांक ०२/०७/२०२२ रोजी गुन्हा दाखल असून सदरचा गुन्हा हा रेकॉर्ड वरील आरोपी शंकर साबणे, रा. गेंदालाल मिल जळगाव याने व त्याचे साथीदाराने केला असून त्यांचा शोध घेवून पुढील योग्य ती कारवाई करणेबाबत वर नमुद पथकास आदेश दिल्यावरून वरील पथकाने रेकॉर्ड वरील गुन्हेगार १) शंकर विश्वनाथ साबणे रा. गेंदालाल मिल जळगाव याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवून त्याचे इतर साथीदार २) गौरव जगन सांळुखे, ३) महेश संतोष लिंगायत तिघ रा. गेंदालाल मिल जळगाव यांना ताब्यात घेवून सदर गुन्ह्या बाबत विचारपुस करता सदरचा गुन्हा १) शंकर विश्वनाथ साबणे, २) गौरव जगन सांळुखे, ३) महेश संतोष लिंगायत तिघ रा. गेंदालाल मिल जळगाव यांनी त्याचे अजुन इतर २ साथीदारासह केल्याची कबुली दिली आहे. तिघ आरोपीतांना पुढील कारवाई करीता जळगाव शहर पो.स्टे.ला हजर केले आहे.