५०० रुपयांची लाच भोवली कोषागार अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात.

यावल -:तहसील कार्यालयातील कोषागार अव्वल कारकून पाचशे रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे यावल तहसील कार्यालयात खळबळ उडाली आहे.

यावल तहसील कार्यालयातील कोषागार विभागातील अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याने काम करण्याच्या मोबदल्यात ५०० रूपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांनी तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. अव्वल कारकून मुक्तार फकीरा तडवी याने कोणत्या कारणासाठी पैसे घेतले याची चौकशी सुरू आहे.