रावेर प्रतिनिधी– राजेंद्र महाले— रावेर तालुक्यातील शिर्डी गावात राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्रीमती सीमा झावरे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय निरीक्षक श्री सुजित ओ कपाटे राज उत्पादन शुल्क भुसावळ यांच्या पथकास मिळालेल्या खात्रीशीर गुप्त बातमी नुसार दि. 08/03/2022 रोजी खिर्डी या ठिकाणी छापा टाकून देशी दारूची अवैधरित्या विक्री करताना ढोल आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलेले असून त्यात देशी दारूचे 40 बॉक्स असा एकूण एक लाख 17 हजार दोनशे वीस रुपये किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल आरोपीत इसम नामे 1) कुलदीप भागवत जयस्वाल 2) जितेंद्र रमेश जयस्वाल यांच्या ताबे कब्जा तुं जप्त केला व त्यांच्या वृद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे सदर अवैद्य मद्यसाठा मिळून आल्याने मोठ्या प्रमाणात मध्य तस्करी ची टोळी कार्यरत असण्याची शक्यता आहे याबाबत तपास सुरू आहे सदर कारवाई विभागीय निरीक्षक श्री सुजित कपाटे साहेब राज्य उत्पादन शुल्क भुसावळ,श्री राजेश सोनार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भुसावळ,श्री सत्यविजय ठेगडे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यावल, तसेच विभागीय निरीक्षक पथकाचे जवान वाहन चालक सागर देशमुख,सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री मधुकर वाघ, जवान नितीन पाटील, विठ्ठल दादा हटकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग श्री अर्जुन ओहोळ आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगाव श्रीमती सीमा झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागीय निरीक्षक श्री सुजित ओ. कपाटे करीत आहे.