ममुराबाद येथील अकरा ग्रा पं सदस्यांनवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार अमरण उपोषण.ज्ञानेश्वर पाटील

जळगाव संदेश

ममुराबाद – नामनिर्देशन पत्र सादर करताना ग्रामपंचायत मधील अकरा ग्रामपंचायत सदस्यांनी आपल्या स्थावर व जंगम मालमत्तेची मोठ्या प्रमाणात माहिती लपविल्याने सदर ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांना अपात्र करण्यात यावे अशी तक्रार म.जिल्हाधिकारी यांचे कडे करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या चौकशी कामी म गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे. परंतु गटविकास अधिकारी यांचे मार्फत आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी न करता सदर तक्रार राजकीय हस्तक्षेप आणि दबावापोटी दाबण्याचा प्रयन्त करण्यात येत आहे. तरी सदर तक्रारीची 15 दिवसांच्या आत चौकशी करूण कारवाई न झाल्यास म.जिल्हाधिकारी जळगाव यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्या बाबतचे निवेदन तक्रारदार ज्ञानेश्वर पाटील यांनी

म. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव तसेच मा जिल्हाधिकारी सौ जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांना देण्यात आले आहे.