जळगाव संदेश
एरंडोल -तालुक्यातील खर्ची खुर्द येथील घरकुल याद्यांमधील घोळप्रकरणी ग्रामसेवक व संगणक ऑपरेटर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी १८६ लाभार्थ्यांची ग्रामसभेत निवड करण्यात आली होती. त्यापैकी नमुना नंबर आठवरून ३० लाभार्थी लाभ घेतलेले दिसून आले. यानंतर १५६ लाभार्थ्याची ग्रामसभेत ठराव करून निवड करण्यात आली. मात्र ऑनलाईन मध्ये १२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नंतर १०७ लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली, अशी माहिती पंचायत समिती स्तरावरून देण्यात आली. सर्वांना लाभ मिळाला पाहिजे या हेतूने खर्ची खुर्द येथील दिलीप पाटील यांनी तशी मागणी केली होती तसेच राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव किशोर पाटील यांनी पंचायत समितीकडे अर्ज सादर केला होता. मात्र तांत्रिक अडचणीमुळे केवळ १०७ जणांचे घरकुल मंजूर झाल्याचे दिसून आले. म्हणून दोघांना नोटिसा देण्यात आल्या.