ममुराबाद येथील ग्रा पं सदस्या सुनिता चौधरी यांच्यावर अपात्रतेची कारवाई साठी गटविकास अधिकारी यांचे कडे तक्रार

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

ममुराबाद – ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नामनिर्देशन पत्र सादर करताना ग्रामपंचायत सदस्य सौ सुनिता अनंता चौधरी यांनी उमेदवाराने द्यावयाच्या शपथपत्रा मध्ये विहीत व अचूक माहिती सादर केलेली नाही आणि खोटे शपथपत्र सादर केले आहे म्हणून मां जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्याकडे खोटे शपथपत्र सादर करणे यामुळे अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी तक्रार ज्ञानेश्वर अरुण पाटील यांनी दाखल केली होती.आणि सदर तक्रार चौकशीसाठी आपणाकडे वर्ग करण्यात आली आहे.परंतु अद्यापपावेतो आपल्या कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारची चौकशी करून संबंधितांवर कारवाई होत नसल्यामुळे पुढील चौकशीसाठी पुरावे सादर करीत आहे. सदर पुरावे स्वीकार करून पुढील चौकशी करण्यात यावी.

शपथपत्रा मध्ये खालील मालमत्तेची माहिती लपवण्यात आलेली आहे.

(1) सौ सुनिता अनंत चौधरी यांचा खाते क्रमांक 54 गट क्रमांक 1014 चा उतारा                                        (2) सौ सुनीता अनंत चौधरी यांचा खाते क्रमांक 1166 गट क्रमांक 1026चा उतारा                                    (3) सौ सुनीता अनंत चौधरी यांचे यांचे पती श्री अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक 1165 गट क्रमांक 882 चा उतारा                                                            (4) श्री अनंत सोपान चौधरी यांच्या खाते क्रमांक 1634 गट क्रमांक 1279 चा उतारा

(5) श्री अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक 1634 गट क्रमांक 880/प्लॉट /19 चा उतारा

(6) श्री अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक खाते क्रमांक 1634 गट क्रमांक 880/प्लॉट/ 1 चा उतारा      (7) श्री अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक 1634 गट क्रमांक 1020 चा उतारा                                    (8) अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक 17962 गट क्रमांक 883 चा उतारा                                          (9) श्री अनंत सोपान चौधरी यांचा खाते क्रमांक 395 गट क्रमांक 1318/43 चा उतारा                                  (10) सौ सुनीता अनंत चौधरी यांच्यावरती राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत अनियमितता आणि अपहार मुळे जळगाव तालुका पोलीस स्टेशन वर ती गुन्हा दाखल आहे परंतु त्यांनी आपल्या नामनिर्देशनपत्रा मध्ये कुठलाही गुन्हा दाखल नाही असे म्हटले आहे सौ सुनीता अनंत चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल आहे असे माननीय जळगाव न्यायालय यांचा पुरावा अशी तक्रार तक्रारदार श्री ज्ञानेश्वर पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली आहे.