चोपडा प्रतिनिधी-सध्या राज्यभर सुरू असलेल्या एस.टी.कर्मचारी संपाला चोपडा तालुका महर्षी वाल्मिकी कोळी समाज मंडळाने पाठिंबा जाहीर केला आहे.एस.टी. महामंडळाचे खाजगीकरण ऐवजी सरकारीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील एस.टी. कर्मचारी गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून संपावर उतरले आहेत.एस.टी.कर्मचारी हा आपल्या प्रत्येक समाजातील व परिवारातील एक सदस्य आहे,असे समजून तालुक्यातील जनतेने एस.टी. कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्काच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपाला पाठिंबा दिला पाहिजे.या पार्श्वभूमीवर प्रथमच चोपडा तालुक्यातील कोळी समाजाने संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशी माहिती चोपडा म.वाल्मिकी कोळी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.
संपकरी कर्मचाऱ्यांना धाकदपटशा करून निलंबित करणे,आगारातून बाहेर काढणे,पिण्याचे पाणी,सार्वजनिक मुतारी, शौचालय वापरास बंदी करणे असा त्रास दिला जात आहे. ज्या खाजगी प्रवासी वाहनांना आगाराच्या आजूबाजूला थांबू दिले जात नव्हते,आज त्या वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी आगारात जागा दिली जात आहे.संपकर्यांच्या समस्या जाणुन घ्यायला भाजप व्यतिरिक्त इतर कोणीही पोहोचलेले नाही.ही खेदाची व माणुसकी शुन्य बाब आहे.
जगन्नाथ बाविस्कर माजी संचालक..मार्केट कमिटी,चोपडा.