सुनसगावच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय मिळत नसल्याने प्रजासत्ताक दिनी उपोषणाचा इशारा ?

भुसावळ – येथील शेतकऱ्याचे वारावादळाने अंगावर झाड पडल्याने म्हैस मेली होती परंतु अद्यापही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्याने प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

या बाबत माहिती अशी की, येथील वार्ड क्रमांक तीन मधील रहिवाशी रामचंद्र पांडुरंग धनगर हे दुग्धव्यवसाय करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र दि. २७ एप्रिल २०२३ रोजी या परिसरात चक्री वादळ आले होते त्यात त्यांच्या एक लाख रुपये किंमत असलेल्या म्हशीच्या अंगावर मोठे झाड पडल्याने त्यात म्हशीचा जागीच मृत्यू झाला होता. या बाबत सर्व पंचनामे व माहिती पुर्ण करुन शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी कागदपत्रे सादर केली होती परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे नुकसान भरपाई न मिळाल्यास येत्या २६ जानेवारी रोजी आमरण उपोषणाचा इशारा शेतकरी रामचंद्र धनगर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

या पत्रात आमदार संजय सावकारे यांनी लक्ष घालून नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे ही म्हटले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh