जळगाव – येथिल कांचन नगरातील जागृत श्री.गुरुदत्त मंदिर संस्थान, मार्फत दत्त जयंतीच्या पार्श्व भूमीवर सुरु असलेले शिव महापुराण कथा व गुरुचरित्र गाथा दिंडी सोहळ्याचे सुरुवात मंदिराचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळी व सौ. सुरेखा कोळी यांच्या हस्ते करण्यात आली. बँडच्या तालावर भक्तगणधुंद होऊन नाचत होते.दिंडी सोह्ळात हजारोने भाविक सहभागी झाले होते. दिगंबराचा व श्री शिवाय स्तुभ्यंम च्या जय घोष करीत व भजन व गवडन सदर करीत होते. काही भक्तांनी तुळस – वृंदावन कळस, गुरुचरित्र व शिव महापुराणकथा डोक्यावर घेऊन जलोष करीत होते.कांचन नगरात प्रत्येक घरासमोर रांगोळी-दिप लावून पुष्प अर्पण करून फटाके फोडीत दिंडीचे स्वागत करीत होते. दत्त मंदिरात दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर ईच्छापुर्ती काशी-विश्वनाथ महादेव मंदिर, गणपती व हनुमान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असून आज मूर्तीमध्ये प्राण टाकण्यात येणार आहे.
मंदिरात आज सकाळी ५ ते ७ काकड आरती, ७ ते ८ अभिषेक,८ ते १० प्राणप्रतिष्ठा व होम हवन १० ते १२ ह.भ.प. देवदत्त महाराज मोरदे यांचे काल्याचे किर्तन;१२ ते १२;३० मान्यवरांच्या हस्ते महाआरती पुरस्कार वितरण,दुपारी १ ते ३ महाप्रसाद, संध्या ४ ते ६ भजन, संध्या ६ ते ७ आरती व हरिपाठ होईल रात्री दत्त जन्मावर ह.भ.प. अतुल महाराज बेटावदकर यांचे कीर्तन होईल.व आरती होईल कार्यक्रमाची सांगत आभार प्रदर्शन करून विश्वस्त राजेंद्र कोळी हे करतील.