सुनसगाव येथे पशु वंध्यत्व निवारण शिबिरात पशूंची तपासणी !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील पशु वैद्यकीय दवाखाना सुनसंगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत उज्वल महाराष्ट्रा करीता पशु उत्पादन वाढविण्याकरिता राज्यव्यापी पशू वंध्यत्व निवारण अभियानांतर्गत दि.२० नोव्हेंबर ते दि. १९ डिसेंबर२०२३ या कालावधी दरम्यान राज्यभरात गावोगावी वंध्यत्व निवारण शिबिरे‌ घेण्यात येत आहेत.त्या अंतर्गत दि. १४ डिसेंबर रोजी सुनसंगाव येथे वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले या वेळी पशु पालकांनाच्या माहितीसाठी . शिबिराच्या आदल्या दिवशी गावात दवंडी देण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकनियुक्त सरपंच सौ.काजल भोजराज कोळी व उपसरपंच एकनाथ फुलसिंग सपकाळे, ग्रा पं सदस्य चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रंशांत येवले यांनी उपस्थित पशु  पुशुधनाची घ्यावयाची काळजी व त्यांचे पालनपोषण कसे करावे याविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले प्रसंगी डॉ. भावेश चौधरी डॉ. राजेंद्र डांबरे डॉ. योगेश पाटील. डॉ.पवन सरोदे डॉ गोपाल सोनवणे, महेश भारुळे हे उपस्थित होते शिबिरामध्ये कृष्णा कोळी, भैय्या कंकरे, सतिष पाटील, विकास सोनवणे व इतर पशुपालक उपस्थित होते.