प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरात सालाबादप्रमाणे यंदाही नामसंकीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या वर्षी श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून कथा प्रवक्ते हभप संजय महाराज चितोडा हे सुश्राव्य वाणीतून कथा निरुपण करणार आहे.
दि.१३ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत पारायण सप्ताहात दररोज सकाळी काकडी आरती , विष्णू सहस्त्रनाम व ११ ते ३ कथा निरुपण आणि संध्याकाळी श्री हरिपाठ व रात्री ८ ते १० अनुक्रमे १३ रोजी हभप रमेश महाराज सुनसगाव, १४ रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज मानकर, १५ रोजी हभप प्रतिभाताई सोनवणे जळगाव, १६ रोजी हभप संजय महाराज ब्राम्हणे, १७ रोजी हभप मालताताई महाराज ब्रह्मपूर , १८ रोजी हभप बालकिर्तनकार कुणाल महाराज धरणगाव , १९ रोजी हभप निवृत्ती महाराज शिरसोलीकर तर दि. २० रोजी हभप दुर्गादास महाराज नेहेते यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. मृदंगमणी हभप मुरलीधर बेंडाळे तर गायनाचार्य गोपाळ महाराज भांबलवाडी , कैलास महाराज शिंगत, महेश महाराज कळमोदा व गावातील समस्त भजनी मंडळ राहणार असून महाप्रसाद दि. २० रोजी सकाळी १० ते १ या वेळेत होणार असून परिसरातील भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरातील आयोजक व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.