जळगाव – तालुक्यातील ममुराबाद येथील ग्रामपंचायत कार्यालयात त्याचप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान दिन साजरा करण्यात आला. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . त्यानंतर सामुहिक रित्या संविधानाचे वाचन करण्यात आले.
यावेळी सर्व समाज बांधव तसेच ग्रामपंचायत सरपंच हेमंत चौधरी, सदस्य अमर पाटील, विलास सोनवणे, आदि सदस्यांनी सविधानाची पुजा. त्यानंतर पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ व बौद्ध उपासक व उपासिका उपस्थीत होते.