प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या गोडाऊन मध्ये मतदान करण्याच्या EVM मशिनी ठेवण्यात आलेल्या आहेत. या गोडाऊन मध्ये पावसाळ्यात पाऊसाचे पाणी पडू नये म्हणून छतावर प्लास्टीक कागद टाकण्यात आलेला आहे. मात्र रविवारी दिवाळी असल्याने रात्री फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती त्यात साडे नऊ वाजेच्या सुमारास या गोडाऊन च्या छतावर राॅकेट पडल्याने छताने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच भुसावळ अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. या बाबत ची माहिती जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना मिळताच त्यांनी परिस्थिती जाणून घेतली. व सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सदरचा प्रकार लवकर लक्षात आला नसता तर कदाचित मोठे नुकसान झाले असते असे बोलले जात आहे.