सुनसगाव श्री मनुमाता मंदिरात भाविकांची अलोट गर्दी !

भुसावळ येथील श्री मनुदेवी माता मंदिरात संपूर्ण नवरात्रीच्या काळात अलोट गर्दी होतांना दिसत असून परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येताना दिसत आहेत.

वाघुर नदीच्या काठाचा किनारा लागून निसर्गरम्य वातावरणात येथील भाविक भक्त व ग्रामस्थांच्या सहकार्याने भलेमोठे मंदिर बांधण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मंदिरात जी मुर्ती आहे ती कोठेही नाही. या मंदिरात श्री मनुमाता मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना श्री श्री १००८ आत्मबोधानंद श्री हस्तकर गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी माता या ठिकाणी अनेक भाविक दर्शनासाठी जातात परंतु आता परिसरातील अनेक भाविक सुनसगाव येथे याच मंदिरात दर्शनासाठी येत आहे .

मंदिराच्या आवारात मोठे शेड उभारले आहे विशेष म्हणजे या मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी आरती होते आणि खास वैशिष्ट्य म्हणजे दर पोर्णिमेच्या संध्याकाळी येथे खिचडी व कढी चा महाप्रसाद केला जातो. महाप्रसाद देण्यासाठी अन्नदाते एवढे तयार आहेत की एक ते दिड वर्ष अन्नदानासठी नंबर लागत नाही. मंदिरात सर्व गोष्टी सोयी सुविधा उपलब्ध आहेत मात्र ट्रस्ट चे चेअरमन सह अनेक पदाधिकारी मयत झाल्याने पाहिजे तसे मंदिराकडे लक्ष दिले जात नाही नवरात्र उत्सव संपल्यावर दोघे तिघेच या मंदिराची आरती व साफसफाई चे काम पाहतात. जर नियमानुसार ट्रस्ट झाली तर शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून मंदिराचा विकास होऊ शकतो असे सांगितले जात आहे.