नवसाला पावणारी सुनसगावची भवानी माता! ‘विजया दशमीला होते भाविकांची गर्दी ‘

प्रतिनीधी – जितेंद्र काटे

भुसावळ भुसावळ तालुक्यातील सुनसगाव – गोजोरा रस्त्यावर तळ्याच्या विहिरी जवळ श्री भवानी माता मंदिर आहे.या मंदीराचा जिर्णोद्धार येथील ठाकूर विसावे परिवारातील समाज बांधवांनी केला असून विजया दशमीला या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होते. राज्य मार्ग २७० ला लागूनच हे मंदिर असल्याने व लांबूनच मंदीराच्या कळसाचे दर्शन होते त्यामुळे येणारे जाणारे भाविक या ठिकाणी थांबून दर्शन घेतात.

श्री भवानी मातेचे मंदिर अतिशय सुंदर व लोभनिय आहे तसेच निसर्गरम्य परिसरात असल्याने मनाला प्रसन्नता वाटते.

या मंदिरा बाबत येथील प्रकाश हायस्कूल चे सेवानिवृत्त कर्मचारी प्रल्हाद ठाकूर यांनी सांगितले की, ही देवी ठाकूर विसावे परिवाराचे कुलदैवत आहे त्यामुळे ठाकूर विसावे परिवाराचे सर्व भाविक भक्त नवरात्रात नऊ दिवस देवीच्या मंदिरात नवरात्री उत्सव साजरा करतात. अगोदर या ठिकाणी या देवीचे फक्त बाणे होते मात्र गावातील एका व्यक्तीला या ठिकाणी शेतीची राखण करीत असताना साक्षात्कार झाला आणि त्यांनी सोनू ठाकूर यांना या ठिकाणी देवीचा ओटा बांधावा असे सांगितले त्यामुळे ठाकूर परिवाराचे सदस्य एकत्र येऊन त्यांनी छोटेसे मंदिर बांधले आणि नित्यनेमाने या ठिकाणी श्री भवानी मातेची उपासना करु लागले काही काळ गेल्यानंतर सर्व ठाकूर विसावे परिवाराचे दिवस पालटले आणि सर्वांनी एकत्र येऊन मंदीराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले आता एक सुंदर मंदीर या ठिकाणी उभे आहे सर्व भाविक भक्त या मंदिरात जाऊन आपली इच्छा प्रकट करतात भाविकांनी मानलेला नवस या ठिकाणी पुर्ण होतो असे प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या भाविक भक्तांनी सांगितले असून आज रोजी ठाकूर परिवारातील सदस्य मोठमोठ्या पदांवर अधिकारी आहेत.