महाराष्ट्रातील 76 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर ! तीन अधिकाऱयांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

महाराष्ट्र – स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील 76 पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना पदकाचे गिफ्ट मिळाले.

केंद्रीय गृह विभागाकडून आज राष्ट्रपती पोलीस पदकांची घोषणा झाली असून देशातील 954 पोलिसांना हा बहुमान मिळाला आहे. महाराष्ट्रातील 76 पोलिसांचे पदकावर नाव कोरले गेले आहे. यात तिघा वरिष्ठ अधिकाऱयांना विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’, 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहे.

– विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक – अपर पोलीस महासंचालक प्रवीण सांळुखे, विनयकुमार चौबे, विशेष पोलीस महानिरीक्षक जयंत नाईकनवरे.

– 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ – रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारू कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.

– गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’ – विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ, पोलीस उपमहानिरीक्षक विजय पाटील, उपनिरीक्षक राजेश वाघ, उपअधीक्षक अरुण सावंत, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,

अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, उपअधीक्षक सुभाष दूधगावकर, निरीक्षक तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, उपनिरीक्षक व्यंकटेश पलकुर्ती, सहाय्यक फौजदार वलू लाभाडे, निरीक्षक अरुणकुमार सपकाळ, सहाय्यक फौजदार संजय जाधव, उपनिरीक्षक उमर शेख, रविकांत कदम, निरीक्षक प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, उपनिरीक्षक चंद्रकांत साळुंके, सहाय्यक फौजदार दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, उपनिरीक्षक सुनील नवार, सहाय्यक फौजदार संजय माळी, अंबादास हुलगे, सहाय्यक फौजदार शामराव गडाख, सहाय्यक फौजदार मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, सहाय्यक कमांडंट भानुदास पवार, निरीक्षक अशोक लांडे, भास्कर कदम, उपनिरीक्षक गुरुनाथ गोसावी, सहाय्यक फौजदार जगदीश भुजाडे, राखीव पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर, निरीक्षक कैलास नागरे आणि उपअधीक्षक महादेव पाटील यांचा समावेश आहे.