“सीतेच्या सौंदर्याच्या मागे राम आणि रावण वेडे होते”, राजस्थान सरकारमधील मंत्र्याचे वादग्रस्त विधान

“माता सीतेच्या सौंदर्याची कल्पना कोणीही करू शकत नाही, माता सीता सुंदर होती. राम आणि रावण यांसारखे अद्भुत मानव सीतेच्या मागे मागे वेडे झाले होते.” असे वादग्रस्त विधान राजस्थानचे सैनिक कल्याण मंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी केले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

खरंतर राजेंद्र सिंह गुढा यांनी स्वतःची तुलना माता सीतेशी केली आहे. हावभावांमध्ये गूढ यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि विधानसभेचे सदस्य सचिन पायलट यांना राम आणि रावण असे संबोधले आहे.

गुढा यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात त्यांनी माता सीतेच्या गुणांची स्वत:शी तुलना केली आहे. ते म्हणाले की, “माझ्या गुणांमुळे आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट माझ्यामागे धावत आहेत.” हा व्हिडिओ गुढगौडजी सीएचसी येथील डिजिटल एक्स-रे मशीनच्या उद्घाटन समारंभाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये गुढा म्हणाले की, माता सीतेच्या सौंदर्याची कल्पना कोणीही करू शकत नाही. तिच्या आकर्षणामुळेच श्री राम आणि रावण सारखे अद्भुत पुरुष वेडे झाले.