हिंदुस्थानच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश न दिल्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. तसंच, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, धर्मेंद्र प्रधान यांना मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळून त्यांनी दर्शन घेतल्याचा फोटोही प्रसिद्ध झाला आहे. राजकीय कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी हे फोटो ट्वीट करून संपूर्ण देशाचा अपमान झाल्याचं म्हणत या प्रकारच्या चौकशीची मागणी केली आहे.
हे फोटो दिल्ली येथील जगन्नाथ मंदिरातील आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत राष्ट्रपती मुर्मू या गाभाऱ्याच्या बाहेर उभं राहून दर्शन घेताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसंच तिसऱ्या फोटोत अश्विनी वैष्णव दिसून येत आहेत. त्यांना थेट जगन्नाथांच्या चरणापर्यंत स्पर्श करण्याची संधी मिळाल्याचं दिसून येत आहे. हे फोटो ट्वीट करून योगेंद्र यादव यांनी प्रश्न विचारला आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांना गाभाऱ्याच्या बाहेर उभं करण्यात आलं आणि अश्विनी वैष्णव यांना तसंच धर्मेंद्र प्रधान यांना मात्र गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता आलं. हा नेमका काय प्रकार आहे, याची विचारणा करून यादव यांनी या प्रकाराच्या चौकशीची मागमी केली आहे. तसंच, जर हे असंच घडलं असेल तर हा संपूर्ण देशाचा अपमान असल्याचंही योगेंद्र यादव म्हणाले आहेत.
इस प्रकरण का पूरा सच देश के सामने आना चाहिए। अगर सच यह है कि महामहिम राष्ट्रपति के साथ जातीय भेदभाव हुआ तो यह पूरे देश का अपमान है और संगीन अपराध है। https://t.co/mmyEQN9hfF
— Yogendra Yadav (@_YogendraYadav) June 25, 2023