आळंदी येथे मिंधे सरकारच्या पोलिसांनी रविवारी वारकऱ्यांवर अमानुषपणे लाठीमार केला. दंगलीच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले असताना वारकऱ्यांवर केलेल्या या लाठीचार्जमुळे राज्यासहित देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान होण्याआधी या सोहळय़ाला गालबोट लागल्याने स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मिंधे सरकारविषयी जनतेत रोष निर्माण झाला आहे.
या घटनेचा निषेध करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ‘वा रे हिंदुत्व’ असे म्हणत मिंधे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पोलिसांकडून झालेल्या हल्ल्याची आपबिती सांगणाऱ्या जळगावच्या एका वारकऱ्याचा व्हिडिओ शेअर केला. दानवे यांनी ट्विट मध्ये लिहिले की, ‘वारकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत या सरकारचा दम गेला आहे. सबंध जगाला शांती शिकवणाऱ्यांवर असा हल्ला होणे व हात उचलणे दुर्दैवी आणि संतापजनक आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे मोकाट, अन वारकाऱ्यांवर लाठ्या! वा रे हिंदुत्व, हेच का वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न… सरकारने या जळगावच्या वारकऱ्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे.’
वारकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत या सरकारचा दम गेला आहे. सबंध जगाला शांती शिकवणाऱ्यांवर असा हल्ला होणे आणि हात उचलला गेला असेल तर हे दुर्दैवी, संतापजनक आहे. औरंगजेबाचे पोस्टर झळकवणारे मोकाट, अन वारकाऱ्यांवर लाठ्या! वा रे हिंदुत्व! हेच का वंदनीय बाळासाहेबांचे स्वप्न… सरकारने या… https://t.co/IpbBLkfjeP
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 11, 2023