भुसावळ प्रतिनिधी – तालुक्यातील १६ गावातील पोलीस पाटील पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात आरक्षण पुढीलप्रमाणे –
१)सुनसगाव – अराखीव खुला
२)बेलव्हाय – इतर मागास प्रवर्ग
३)मिरगव्हाण – अनुसूचित जाती महिला
४)निंभोरा खुर्द – अनुसूचित जमाती
५)जोगलखोरी – अनुसूचित जमाती
६)पिंप्री सेकम – अनुसूचित जमाती
७)विल्हाळे – विमुक्त जाती
८)साकेगाव – भटक्या जमाती ब
९)पिंपळगाव बुद्रुक – इतर मागास प्रवर्ग
१०)तळवेल – इतर मागास प्रवर्ग महिला
११)टहाकळी – इतर मागास प्रवर्ग महिला
१२)जोगलखेडे – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
१३)खडके – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
१४)चोरवड – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक
१५)कन्हाळे खुर्द – अराखीव खुला
१६)बेलखेडे – अराखीव खुला.
अशा प्रकारे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आता इच्छूक उमेदवारांनी कंबर कसली असून जो तो कामाला लागलेला दिसत आहे.