नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी मंदिरात ड्रेसकोड लावण्याचा विचार सुरू असल्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. ड्रेसकोडला आपला विरोध नाही मात्र तो सगळ्यांना असतावा, पुजाऱ्यांनी देखील उघडे बसू नये, त्यांनीही सदरा घालावा, असं भुजबळ म्हणाले.
नाशिक येथे बोलताना ‘ड्रेसकोड वैगरे ठीक आहे. मंदिरात प्रवेश करताना निटनेटके कपडे असावेत हे मी समजतो. पण त्याचा अतिरेक नको आणि सगळ्यांनी नीट नेटके कपडे घालायचे असतील तर आतामध्ये जे उघडे बंब असतात ना पुजारी वैगरे त्यांनी सुद्धा सदरावैगरे घालावा. गळ्यात माळ घातली असेल तर आपल्याला कळेल की ते पुजारी आहेत. ते सुद्धा अर्धनग्न नसतात का? त्यांनी सुद्धा सदरा घालावा’, अशी स्पष्ट भूमिका माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे.