भुसावळ – येथील इंदिरा नगर भागातील रहिवाशी व आदिवासी भिल्ल समाजाचे कार्यकर्ते गोपाल भिवसन ठाकरे (वय ३९) यांना तिव्र उन्हाचा त्रास झाल्याने उष्मघाताने मृत्यू झाल्याची घटना दि.१८ रोजी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे.
या बाबत माहिती अशी की, गोपाळ भिवसन ठाकरे हे सुदर्शन पेपर मील मध्ये बाॅयलर जवळ काम करणारे मजूर होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे तापमान ४५ डिग्री पर्यंत पोहचत आहे. तापमानाची उष्णता त्यात बाॅयलर ची धगधगता यामुळे गोपाळ ठाकरे यांना दुपारच्या वेळी अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी आल्यावर मळमळ उलटी असे उष्मघाताची लक्षणे दिसू लागले व कसे तरी जेवण करून झोपले असता त्याचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात उष्मघाताने मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या उन्हाचा फटका येथील युवकाला बसल्याने गोपाळ ठाकरे यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,मुली असा परिवार असून शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आदिवासी भिल्ल समाजाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.