श्री विश्वनाथ महादेव मंदिराची मनोभावे सेवा करणारा खरा उपासक…. नंदूभाऊ चौधरी….

हेमकांत गायकवाड

चोपडा :शहरातील बोरोलेनगर १ भागात श्री विश्वनाथ महादेवाचे भव्यदिव्य मंदिर साकारले आहे . आजकाल मंदिर उभारणे सोपे आहे पण मंदिराची देखभाल करणे , मंदिराची सेवा करणे , पूजा पाठ करणे दुर्मिळ होत चालले आहे . पण चोपडा शहरातील बोरोलेनगर निवासी नंदूभाऊ चौधरी श्री विश्वनाथ महादेव मंदिराची अहोरात्र मनोभावे सेवा करीत आहेत . सकाळ – संध्याकाळ अभिषेक , पूजा पाठ , मंदिर व परिसराची स्वच्छता अहोरात्र मनोभावे करीत आहेत. स्वतः आरतीचे गायन अतिशय उत्कृष्टरित्या करतात , आवाजातील स्पष्टता , शुध्दता व लयबध्दता वाखाणण्याजोगी आहे .

नंदूभाऊ चौधरी हे आपली नोकरी सांभाळत इतर पुर्ण वेळ ते मंदिराच्या सेवेसाठी देत असतात. दोन्ही वेळ आरतीचे नियोजन , आरतीचे मानकरी, आरास व्यवस्था इत्यादी सेवा ते निष्काम भावनेने करीत आहेत.

त्यांच्या या निष्काम करीत असलेल्या सेवेबद्दल पत्रकार आर डी पाटील यांनी त्यांचा सत्कार केला . सदर सत्कार स्वीकारायला नंदूभाऊ चौधरी अजिबात तयार नव्हते , ते म्हणाले की, मी सत्कारासाठी काम करीत नाही , तर श्री विश्वनाथ महादेव माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत.त्यांच्या सत्कार प्रसंगी पत्रकार आर डी पाटील , प्रदिप काशिनाथ शिरसाठ , प्रल्हाद पाटील यांसह अनेक भाविक व बालगोपाल मंडळी उपस्थित होती.

भगवान शंकराला देवांचे देव महादेव म्हंटले जाते. ज्या व्यक्तीला कोणत्याच अपेक्षा , लोभ नाही तोच व्यक्ती महादेव असू शकतो. मनुष्याच्या स्वभावात कामाच्या बदल्यात मोबदला हवा असतो. महादेव तेच आहेत जे कधीच मोबदल्याची अपेक्षा करत नाहीत . ते नेहमी लोकांच्या, समाजाच्या कल्याणासाठी झटत असतात. महादेव गरीब, श्रीमंत व राजा सगळ्यांचे आराध्य दैवत आहेत. या उक्ती प्रमाणे नंदूभाऊ चौधरी श्री विश्वनाथ महादेव मंदिराची अहोरात्र मनोभावे सेवा करीत आहेत.त्यांच्या हातून मंदिराची नेहमीच सेवा घडत राहो अशा शुभेच्छा पत्रकार आर डी पाटील व उपस्थित मंडळींनी दिल्या आहेत.