महाराष्ट्र – राज्याच्या सत्तांतराच्या केंद्रस्थानी राहिलेल्या गुवाहाटीचं स्थान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार यांच्यासाठी वेगळंच आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार आणि खासदार सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते.दरम्यान आता एकनाथ शिंदे आपल्या सगळ्या आमदार, खासदारांना घेवून अयोध्या दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे एप्रिल महिन्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितलं जात होत.
जानेवारी महिन्यात अयोध्येतील महंत शशिकांत दास महाराज, शत्रुघन दास महाराज तसेच छबिराम दास महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी एकनाथ शिंदे आणि पदाधिकाऱ्यांना अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. मात्र आता एकनाथ शिंदे येत्या 6 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिंदे यांच्या या दौऱ्यादरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.राज्याच्या सत्तांतर झाल्यानंतर शिंवसेना (शिंदे गटाचे) सर्व आमदार खासदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आज कामाख्या देवीच दर्शन घेतलं. मनोभावे सर्वांनी दर्शन घेतलं. सर्वांना आनंद आहे. खऱ्या अर्थाने कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरील संकट दूर व्हावं. शेतकऱ्यांसह सर्व घटकांना सुख-समाधान मिळावं यासाठी आम्ही आलोय. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या स्वागतासाठी तीन मंत्र्यांना पाठवलं होतं. आसामचे मुख्यमंत्री आणि आसाम सरकारचे धन्यवाद.