महाराष्ट्र – राज्यात खरंच महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास मिळतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिक्रिया देताना कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ
महिलांसाठी एसटी तिकीट दरातील ५० टक्के सवलतीमुळे महिला वर्गात आनंदाने वातावरण पाहावयास मिळत आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ही सवलत ही देखील महिलांना समाधान देणारी बाब आहे. या सवलतीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होणार आहे. संगणकीय अथवा ऑनलाईन आरक्षणाव्दारे तिकीट घेतील. प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार द्यावा लागणार आहे. तसेच प्रवास भाड्यातील अपघात सहाय्यता निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू, सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी, असे शासनाच्या परिपत्रकात म्हटले आहे. राज्याच्या बाहेर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांनादेखील या तिकीट सवलतीचा फायदा मिळणार नाही.सवलत रकमेचे होणार लेखापरीक्षण : सवलतीपोटी शासनाकडून महामंडळास मिळणारी रक्कम मोठी असणार आहे. त्या रकमेचा कोणत्याही स्तरावर गैरवापर होऊ नये आणि महामंडळास शासनाकडून प्रतिपुर्ती अचूक मिळावी, यासाठी आगार लेखाकारांनी त्याचे लेखापरीक्षण करावयाचे आहे. महिला सवलतीच्या संदर्भात हिशोब, तपासणी, लेखापरीक्षण, याबाबतच्या सुचना स्वतंत्र परिपत्रकाव्दारे निर्गमित केल्या जाणार आहेत. एका वेळेस एकाच सवलतीचा लाभ : महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना एका वेळेस एकाच सवलतीचा लाभ घेता येतो. त्यामुळे पासधारक विद्यार्थिनींना एका वेळी फक्त एकाच योजनेतील सवलतीचा लाभ घेता येईल. अर्थात मासिक, त्रैमासिक पास अथवा महिला सन्मान योजनेंतर्गत ५० टक्के सवलतीत प्रवास करता येईल. दिव्यांग प्रवाशांना एसटी भाड्यात ७५ टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे महिला वर्गातील दिव्यांग प्रवाशांना प्रवास भाड्यात तीच सवलत अनुज्ञेय करण्यात येईल. महिला सन्मान योजनेअंतर्गत अतिरिक्त ५० टक्के सवलत मिळणार नाही. तसेच साडे तीन ते बारा वर्षे वयोगटातील मुलींना महिला सन्मान योजनेंतर्गत अतिरिक्त ५० टक्के सवलत देण्यात येणार नाही.