जि .प प्राथमिक सेमी इग्लिश स्कूल ममुराबाद येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी,,,

ममुराबाद-:आज दिनांक 2 ऑक्टोबर २०२२ रोजी जि .प प्राथमिक सेमी इग्लिश स्कूल ममुराबाद ता .जि . जळगाव येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक श्री . अविनाश पितांबर मोरे यांनी स्विकारले . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीम कल्पना चौधरी यानी केले . कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली .

https://youtu.be/uYYdNZx-Oh8

विद्यार्थ्यांनी आपले विचार खुपच सुंदररित्या मांडले . इयत्ता 2रीची विद्यार्थीनी योगिनी सोनवणे हिला बक्षीस देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी श्रीमती ज्योती महाजन यांनी आपले विचार मांडले . अध्यक्षांनी गांधीजींचे आणि लालबहाद्दुर शास्त्री यांच्याविषयी आपले विचार मांडले . आभार सौ . जैसवाल मॅडम यांनी मानले या प्रसंगी शाळेतील शिक्षीका श्रीम . आरती चौधरी श्रीम . स्वाती पाटील श्रीम पुनम शिंपी श्रीम प्रिती चौधरी व श्रीम .बधान मॅडम उपस्थित होत्या.