जि प मराठी मुला मुलांची शाळा निंभोरा स्टेशन येथे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरुवर्य श्री रमाकांत सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात.

रावेर प्रतिनिधी राजेंद्र महाले

रावेर – :तालुक्यातील निंभोरा येथील जि. प.मराठी मुला मुलींची शाळा निंभोरा स्टेशन परिसर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी याच शाळेचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुरुवर्य श्री रमाकांत सोनार गुरुजी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यांनी याप्रसंगी स्वातंत्र्य लढ्यात शहीद झालेल्या वीर महापुरुषांच्या बलिदानाचे स्मरण व प्रतिक म्हणजे आपला तिरंगा ध्वज आहे ,असे सांगितले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष , सदस्य, पालक, ग्रामस्थ ,शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दुर्गादास पाटील , ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे, प्रमोद कोंडे, मशिदीचे मौलवी, अफसर शेख,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल गिरडे, मधुकर बिऱ्हाडे दस्तगीर खाटीक विजय भाऊ सोनार नूर मोहम्मद पटेल दिलीप खैरे, समाधान रजाने, आशिष बोरसे, मनोज सोनार शाळेचे मुख्याध्यापक सौ पल्लवी राणे, मॅडम विशाल सोनवणे तसेच शिक्षक वृंद विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग महिला बहु संख्येने उपस्थित होते.