रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू

जळगाव – यावल तालुक्यातील चिंचोली येथे शेतात रोटाव्हेटर मारत असतांना चालकाचा तोल जावून तो रोटाव्हेटरमध्ये अडकला. यामध्ये चालक विजय जानकीराम बाविस्कर (वय ३५, रा. डांभुर्णी, ता. यावल) या चालकाच्या शरिराचे तुकडे होवून त्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना यावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील शेतात मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील डांभूर्णी गावात विजय कोळी हा तरुण वास्तव्यास होता. मंगळवारी सकाळी तो शेतात रोटाव्हेटर मारण्यासाठी गेला होता. शेतात रोटोव्हेटर मारत असतांना अचानक तो जावून विजय कोळी हा त्यामध्ये अडकला. यामध्ये त्याच्या शरिराचे तुकडे होवून त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह यावल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी केतन रेवा फालक यांनी दिलेल्या खबर वरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.