“अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे तुम्ही, टीका सोडा राष्ट्रपतींबद्दल बोलायची तुमची लायकीही नाही!”

मुंबई – उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “माता भगिनींची इज्जत लुटली जात आहे मात्र हे सरकार धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहे. देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी महिला असून मणिपूरच्या घटनेबाबत त्यांचीही संवेदनशीलता नाही” असे टीकास्त्रही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर ठाकरे यांनी सोडले.
या टीकेला आता भाजप महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“राष्ट्रपती पदी आदिवासी महिला, हे उद्धव ठाकरेंना बघवत नाही. उद्धवजी तुमची स्वतःची प्रतिष्ठा उरली नाही, म्हणून सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याचे प्रयत्न करताय, हे किती लाजिरवाणं…!अडीच वर्ष घरकोंबडा बनून राहणारे तुम्हीं… टीका तर सोडा तुमची तर लायकीही नाही राष्ट्रपती पदाबाबत बोलण्याची… तुमची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे सगळं चाललंय, यावरून तुम्ही किती खालचा दर्जा गाठला हे ही कळतंय जनतेला…” असं म्हणत चित्रा वाघ यांनी घणाघात केला.