प्रवीण मेघे
यावल ( प्रतिनिधी ) येथील शहरातील प्रमुख मार्गांना जोडणाऱ्या बुरूज चौकात एका ट्रॅक व मोटरसायकलच्या झालेल्या अपघातात सुदैवाने एका कुटुंबाची होणारी मोठी जिवीत हानी टळल्याची घटना यावल येथे काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे . या संदर्भात वृत्त असे की , यावल शहराशी जोडला गेलेला बुऱ्हाणपुर अंकलेश्वर या मार्गावर अति महत्वाची तहसील कार्यालय , पोलीस ठाणे व विविध शासकीय कार्यालय, शाळा , बॅंक आदी असल्याकारणाने वाहनासह शहरातील नागरीकांची वर्दळ व नेहमीच गजबजलेला परिसर म्हणुन ओळख असलेल्या बुरुज चौकात सायंकाळच्या सुमारास एका ट्रकच्या धडकेत मोटरसायकलचा अपघात झाला यात सातोद येथील तुषार फेगडे यांचे कुटुंब सुदैवाने बचावले , मात्र अपघात झाल्याचे कळताच बुरूज चौकात नागरीकांची एकच गर्दी घटनास्थळी जमली ही गर्दी पाहताच ट्रक चातकांने सावध पवित्रा घेत अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यात धाव घेतली . घटनास्थळी पोलीस ही आले व त्यांनी ट्रक ताब्यात घेतले हा झालेला अपघात किरकोळ जरी असला तरी याची कारणे मात्र अनेक आहेत यात प्रमुख कारण म्हणजे यावल बस स्टॅन्ड ते जुना चोपडा नाका या मार्गावरील रस्त्याच्या दोघ बाजुस मोठ्या प्रमाणावर खाजगी व्यवसायीकांनी अतिक्रमण करून आपली दुकाने रोडाच्या दोन्ही कडे उभी केली असुन, या अतिक्रमणाच्या गोंधळामुळे या मार्गावर यापुर्वी अनेक गंभीर स्वरूपाचे अपघात होवुन त्यात अनेक निरपराधांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे . सार्वजनिक बांधकाम विभाग आणी नगर परिषद यावल यांनी त्वरीत या मार्गावर सातत्याने वाढत असलेल्या अतिक्रमणा विषयी निर्णय घेवुन हा मार्ग अतिक्रमणाच्या विळख्यातुन मोकळा करावा अशी अपेक्षा वाहनधारकांसह असंख्य नागरीक व्यक्त करीत आहे .